Ad will apear here
Next
‘जिओ’ ला वार्षिक ७२३ कोटींचा नफा
मुंबई :  रिलायन्स इंडस्ट्रीजची मोबाईल सेवा प्रदाता कंपनी ‘जिओ’ने या आर्थिक वर्षात सातशे २३ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत तिने पाचशे १० कोटींचा नफा कमावला आहे. नुकतेच कंपनीचे मार्च अखेर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले. त्या वेळी ही माहिती देण्यात आली. 

जिओने सुरुवातीला सर्वात स्वस्त आणि मोफत डेटा सेवा दिल्यामुळे ‘जिओ’ची ग्राहकसंख्या झपाट्याने वाढली. आता १८ कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. डेटाचा वापर वाढवण्यासाठीही कंपनीचे मोठे योगदान आहे. जिओच्या डेटा सेवेत १७.४ टक्क्याने वाढ नोंदवण्यात आली आहे, तर या तिमाहीमध्ये पाचशे सहा कोटी जीबी डेटाचा वापर झाला आहे.  
 
या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, ‘जगभरातील सामाजिक, मोबाईल आणि डिजिटल क्रांतीची प्रगती होत आहे. भारत यात मागे राहिला नाही याचा  मला आनंद आहे. जिओमधील प्रत्येकजण आज अभिमानाने देशाच्या डिजिटल लँडस्केपचे रुपांतर करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. सर्व प्रमुख डिजिटल साधने आणि कौशल्यांसह लाखो भारतीयांचे सक्षमीकरण करीत आहे.  प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आणि भारताला ग्लोबल डिजिटल लीडरशीपमध्ये पुढे  नेण्यासाठी प्रत्येक भारतीयाला जिओ ‘पॉवर ऑफ डेटा’ अर्थात डेटाची ताकद पुरवत आहे.’ 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZKVBN
Similar Posts
‘जिओ’ला दोन वर्षे पूर्ण मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ‘जिओ नेटवर्क’ने अत्यंत स्वस्त दरात मोबाईल डेटा उपलब्ध करून दिल्यामुळे देशातील मासिक डेटावापर २० कोटी जीबीवरून तब्बल ३७० कोटी जीबीवर पोहोचला आहे. एकट्या जिओचे ग्राहक त्यामधील २४० कोटी जीबी डेटाचा वापर करत आहेत. मोबाइल डेटा वापराबाबत भारत १५५ व्या स्थानावावरून पहिल्या क्रमांकावर आला आहे
‘जिओ’तर्फे ‘हॅलो जिओ पोस्टपेड’ची घोषणा मुंबई : रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने (जिओ) नव्या पोस्टपेड योजनेची घोषणा केली असून, भारतातील पोस्टपेड सेवेत नवे बदल आणण्याचे आश्‍वासन कंपनीने दिले आहे. नवी जिओ पोस्टपेड सेवा सर्व ग्राहकांसाठी १५ मे २०१८पासून उपलब्ध होईल.
रिलायन्स आता व्हिडिओ स्ट्रीमिंगच्या क्षेत्रात येण्याच्या तयारीत मुंबई : मोफत डेटा, कॉल्स देत रिलायन्स जिओने मोबाईल सेवा क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता व्हिडिओ स्ट्रीमिंग क्षेत्रात धमाका घडविण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज सज्ज असल्याची चर्चा आहे. गुगल, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, स्पॉटीफाय आदी व्हिडिओ कंटेंट पुरविणाऱ्या कंपन्यांच्या स्पर्धेत रिलायन्स उतरणार आहे.
जिओफोनवरही आता फेसबुक मुंबई : फेसबुक हे स्मार्टफोन जिओफोनवर वापरणे शक्य होणार आहे. ‘न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप’ हे जिओच्या ‘KaiOs’ हे वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारीत आहे. जिओफोनसाठी हे विशेष अॅप्लिकेशन उपलब्ध या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language